केदारकुंड व केदारेश्वर

केदारकुंड व केदारेश्वर
पाटणादेवी मंदिराजवळून २ के. मी.अंतरावर घनदाट झाडीमध्ये पायवाटेने चालत गेल्यावर बर्याच उंचावरुन पाणी पडत असल्याचे दॄश्य पावसाळ्यात दिसते. ज्या ठिकाणी हे पडलेले पाणी साचते तीच जागा म्हणजे केदारकुंड पाणी पडतेवेळी चे दृश्य मनाला आनंद देणारे व अल्हादकारक असते. येथूनच पुढे काही अंतरावर केदारेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर पुर्वी बुजले गेले होते. मद्रासी बाबा नावाच्या साधुने ते मंदिर माती काढुन मोकळे केले. जवळच पाण्याचे एक कुंड असुन त्यास नॆसर्गिक अश्या पायर्या आहेत. त्या ठिकाणी गणपतीची एक मुर्ती आहे ह्या गणापतीस उभा गणपती असे संबोधले जाते. ह्याच ठिकाणी मद्रासी बाबांनी मनःशांतीसाठी वसती केली. असे हे ठिकाण मनःशांतीसाठी उत्तम आहे.