महान गणिती भास्कराचार्य

महान गणिती भास्कराचार्य

भास्कराचार्य या एकाच नावाचे दोन भारतीय विद्वान गणिती संशोधक होवून गेले. त्यापॆकी दुसरे भास्कराचार्य हे विज्जलबिड येथील होते. हे गांव पाटणा हेच असावे असा तर्क येथील एका शिलालेखावरुन ज्ञानकोशकार डाँक्टर. केतकर यांनी केला आहे. ते शान्डिल्य गोत्राचे असून गणेश हे त्यांचे उपास्य दैवत आहे. ज्योतिषशास्त्राचे अध्ययनासाठी त्यांनी ह्या ठिकाणी एक मठ स्थापन केला होता. तो त्यांचा नातु चांगदेव यानेही चालु ठेवला होता. या मठास देवगिरीचे यादवांचे मांडलिक निकुंभ राजे यांचा राजाश्रय होता त्यांचे सिध्दांत शिरोमणी करणकुतूहल,वासनाभास्य, भास्कर व्यवहार.विवाहपटल,सर्वतोभद्र यंत्र, वसिष्ठतुल्य अशी ग्रंथसंपदा आहे. त्यातील लिलावती ग्रंथ सर्वज्ञात आहे. सिध्दांत शिरोमणी ग्रंथाचे चार खंड आहेत. त्यातील प्रथम खंड म्हणजेच लिलावती (पाटीगणित) ह्या ग्रंथाचे उरलेले तिन भाग बिजगणित,ग्रहगणित. गोलाध्याय असे आहेत. वासनाभाष्य हा ग्रहगणीत व गोलाध्याय या दोन भागावरील टिका ग्रंथही त्यांचाच आहे. अशी खुप मोठी ग्रंथसंपदा भास्कराचार्यांची आहे. शुन्याची संकल्पना त्यांनीच मांडली. त्यामुळे गणिताचे एक नवे युग सुरु झाले. या महान गणितीचे आजचे पाटणादेवी हे जन्मस्थान आहे. अंदाजे इ.स.१११४ ते इ.स.११८५ हा त्यांचा कालखंड आहे